महाराष्ट्रात लस खरेदीसाठी जागतिक टेंडर…उपमुख्यमंत्री अजित पवार

0

- Advertisement -

पुणे: राज्यात 1 मे पासून सुरु होणा-या लसीकरण मोहीमेमुळे लसींची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

रेमडेसिविर आणि करोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या सर्वांची खरेदी करण्यात येईल, त्यासाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यात मुख्य सचिव अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, सार्वजनिक आरोग्याचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षणचे सचिव आणि उद्योग खात्याचे सचिव त्याचे सदस्य असतील. टेंडर काढायच्या सूचना सीताराम कुंटेंना दिल्या आहेत”, असेही ते म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांच्याशी चर्चा झाली असता ते सध्या जास्त प्रमाणात लस पुरवठा करू शकणार नाहीत क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या. असे पुनावाला यांनी सांगितल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

- Advertisement -

केंद्राच्या पुरवठ्याबद्दल ते म्हणाले की, जामनगरातील प्रकल्पातून महाराष्ट्राला 250 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत होता, परंतु केंद्र सरकारने पुरवठा कमी केला आहे, केंद्र सरकारशी बोलाचाली सुरु असून पुरवठा पूर्ववत करण्यास आम्ही सांगत आहोत. तसेच केंद्रालाही ऑक्सिजन, रेमॅडेव्हिव्हिर आणि लसांच्या प्रचंड टंचाईचा सामना करावा लागत असल्याने केंद्राने एकतर या वस्तू आयात कराव्यात किंवा राज्याला ती आयात करण्याची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सक्षम खरेदीकर्त्यांनी लस विकत घ्यावी….

लसीच्या किंमतीवरून प्रश्न केला असता, जे लोक लसीची जाहीर झालेल्या किंमतीस खरेदी करण्यास सक्षम आहेत त्यांनी ती खरेदी करावी, ज्यांची लस खरेदीची क्षमता नाही त्यांनी राज्य सरकार मोफत लस देईल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.