यंदाही महाराष्ट्र दिन निर्बंध पाळूनच

0

- Advertisement -

मुंबई: राज्यात कोरोनाच्या उद्बवलेली परिस्थितीमुळे संचारबंदीसह कडक निर्बंध सुरु आहेत. त्यामुळे येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन लागू असलेले निर्बंध पाळत साधेपणानेच साजरा करावा अशा सुचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत.

देशातील कोरोनाच्या प्रकोपात महाराष्ट्राची रुग्णसंख्या वाढतच चालल्याने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 13 एप्रिल पासून 1 मे पर्यंत ब्रेक द चेन या मोहीमे अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी आहे.

- Advertisement -

येत्या 1 मे रोजी राज्याचा स्थापना दिवस असल्याने त्याच्या आय़ोजनावरही निर्बंध लागू असणार असून मागील वर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र दिन राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या निर्देशांनुसारच आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात यावं. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तसेच सर्वांसाठी मास्क वापरत आहेत याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.