राज्यातील अनेक भागात 11 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार

0

- Advertisement -

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) 11 सप्टेंबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर मध्य कर्नाटक, विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, कोकण, गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होण्याची शक्यता असून पश्चिम आणि वायव्य भारतात पाऊस सुरुच राहण्याची शक्यता असल्याचे आयएमडी ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

पुढच्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. ह्याचा सर्वाधिक प्रभाव मराठवाडा,मध्य महाराष्ट्र,कोकणात राहील. मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औंरगाबाद ला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, उस्मानाबाद आणि लातूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 7 आणि 8 रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून 8 आणि 9 सप्टेंबर रोजी गुजरात राज्यांतही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

- Advertisement -

11 सप्टेंबरपर्यंत उत्तर आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचे हवामान कार्यालयाने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) 11 सप्टेंबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा राज्यात मुसळधार पाऊस हवामाऩ खात्याने वर्तविला आहे त्यानुसार ओडिशा सरकारने सोमवारी (6 सप्टेंबर) बऱ्याच जिल्ह्यांना सतर्क केले आहे असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.