मोठी बातमी: राज्यात गृहविलगीकरणाचा पर्याय बंद करण्याचा निर्णय

0

- Advertisement -

राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढीचा शोध घेण्याच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने रुग्णांना घरगुती विलगीकरणाचा पर्याय वंद केला असून त्याऐवजी कोविड केअर सेंटर्स म्हणजेच संस्थात्मक विगलीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.

“राज्यातील रेड झोन मध्ये असलेल्या 18 जिल्ह्यांत जेथे कोरोना विषाणूच्या पाझिटिव्ह रुग्णांचे जास्त प्रमाण आहे. तेथे असलेल्या रूग्णांसाठी घरातील विलगीकरणाचा पर्यात आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यातील रूग्णांना विलगीकरणसाठी कोविड केअर केंद्राकडे जावे लागेल, त्यांना स्वतंत्रपणे परवानगी देण्यात येणार नाही,” असे महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

सर्व रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये जावे लागेल. गृह विलगीकरणात कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्यामुळे संसर्ग अजूनही पसरत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या जिल्ह्यात कोविड केअर सेंटर वाढवण्यास सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आम्ही या जिल्ह्यांना कोविड चाचणीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. कोविड पॉजिटिव रूग्णांच्या उच्च जोखमीच्या संपर्कांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे टोप यांनी सांगितले आहे. तसेच सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांना शासकीय रुग्णालयांचे अग्निशमन व विद्युत ऑडिट करण्यास सांगितले असून अहवाल सादर केल्यानंतर आम्ही त्यांना पैसे देऊ. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

१५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

या’ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद’

बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर

 

गृह विलगीकरणाचा पर्याय का बंद करण्यात आला?

राज्यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येत होते. मात्र, अनेक रुग्ण हातावर विलगीरणाचा शिक्का असतानाही घराबाहेर पडत असल्याचं दिसून आले आहे. त्यांच्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचेही दिसून आले आहे. तसेच या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका निर्माण झाल्याचे दिसून आलं आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशनवर बंदी घातली आहे. त्यामुळे रुग्णांना आता कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. (Maharashtra Bans Home Isolation for Covid Patients in 18 districts)

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.