डेल्टा प्लसचा धोका: राज्यातील ‘या’ शहरात गृहविलगीकरण करण्यात आलेय बंद,

0

- Advertisement -

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे असले तरी राज्यात आता डेल्टा प्लस कोरोऩा विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढताहेत. त्यातच निर्बंधातील शिथिलता देण्यात आल्याने तिस-या लाटेचा धोका वाढत चालला आहे. त्यात नागपूर शहराता डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याने मनपा प्रशासनाने शहरात गृहविलगीकरणाचा पर्याय आता बंद करून संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य कऱण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या संदर्भात सर्व झोन आयुक्तांना आदेश जारी केले आहेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण डेल्टा प्लसचा रुग्ण असू शकतो, ही शक्यता लक्षात घेता त्याच्यापासून विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून घरातच विलगीकरण करण्यात येऊ नये, संसर्ग बाधित असलेल्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात सक्तीचे करण्यात आले आहे.

नागपुरात अजूनही तीन लाख लोकांनी पहिला लसीचा डोस घेतलाच नसून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक बाब असल्याने पहिली लस न घेतलेल्या नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. तसेच गणेशोत्सव, पोळा आदी सण साधेपणाने साजरा करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.

विदर्भात गेल्या 24 तासांत 26 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून नागपूर जिल्हयात गेल्या 24 तासांत सहा नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, हे दिलासा दायक आहे. परंतु कोरोनाची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात असली तरी ‘डेल्टा प्लस’चा धोका कायम आहे.

- Advertisement -

थोडक्यात राज्यातील स्थिती

राज्यात काल दिवसभरात 5 हजार 108 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 हजार 736 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.04 टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे आज राज्यात 159 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 50,393 सक्रिय रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.