3 करोड लसीचे डोस देणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

0

- Advertisement -

मुंबई: जगभरातील तज्ञांच्या मते कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय लसीकरणच आहे. भारतातही कोरोना लसीकरण मोहीमेने वेग पकडला आहे. 16 जानेवारी पासून भारतात लसीकरण मोहिम सुरू झाल्यानंतर 3 करोड लसीचे डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍याने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, गुरुवारपर्यंत (24 जून) महाराष्ट्रात लसीचे 2,97,23,951 डोस देण्यात आले होते, तर शुक्रवारी (25 जून) दुपारी दोन पर्यंत तीन कोटींपर्यंत आकडा पोहोचला. ते म्हणाले, ‘आज 2 वाजेपर्यंत लोकांना देण्यात आलेल्या लसीच्या एकूण डोसची संख्या 3,00,27,217 वर पोहोचली आहे.’

राज्यातील एकूण रुग्णसंख्या पोहोचली 60 लाखांच्या वर

आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार, राज्यात काल गुरुवारी कोविड-19 चे 9,844 नवीन रुग्ण सापडले असून, राज्यातील एकूण बधितांचा आकडा 60 लाखापेक्षा जास्त झाला आहे. काल कोविडमुळे राज्यात 197 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृतकांची एकूण संख्या 1,19,859 झाली आहे.

- Advertisement -

राज्यात कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 95.93 टक्के आहे आणि मृत्यू दर वाढून 2 टक्के झाला आहे. राज्यात मागील 2 तासात 9371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोविड मधून बरे झालेल्यांची संख्या 57,62,661 झाली आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.