मुख्यमंत्र्यांनी मांडली कोरोनामुक्त गावाची संकल्पना

0

- Advertisement -

मुंबई: कोरोना विरुद्धचा लढा सरकार एकट्यानेच लढू शकत नाही. त्यासाठी अगदी गावपातळीवर शिस्तबद्ध पद्धतीने मुकाबला केला पाहीजे. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य़ांनी राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या तीन गावांचे उदाहरण आज राज्यातील जनतेसोबत सामाजिक माध्यमांवरून संवाद साधत असताना दिले.

या ग्रामपंचायतींनी शिस्तबद्धरीतीने रोगाचा मुकाबला केला. त्यामुळे प्रत्येक गावाने तसे केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेल आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखविणारे राज्य आहे. त्यामुळे राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार, तर सोलापूर जिल्ह्यातील दोन गावांनी आपली गावे कोरोनामुक्त करुन महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमलताई यांच्यासारखे यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत असे म्हणत त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्याशी आपण बोलणार असून लवकरच ते राज्यातील सर्व सरपंचाबरोबर बोलतील असे म्हटले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.