दिलासादायक ! राज्यातील रुग्णसंख्येतील घट कायम

0

- Advertisement -

राज्यातील कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होत असून कोरोना रुग्णांची संख्याही आता 30 हजारांच्या खाली आली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत  28 हजार 438 रुग्ण सापडले आहेत तर 679 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत स्पष्ट होते आहे.

राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. तर गेल्या 24 तासांत 52 हजार 898 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 90.69 % एवढे झाले आहे.

राज्यात 2 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने २ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

मुंबईकरांना दिलासा दिवसभरात 953 रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. मुंबईत दिवसभरात 953 रुग्णांची नोंद झाली असल्याची नोंद मुंबई महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.