राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार परिक्षेतून सुट

0

- Advertisement -

मुंबई: देशातील केंद्रीय शिक्षण मंडळाच्या 12 वीच्या परिक्षा रद्द केल्याच्या निर्णयानंतर राज्यातील परिक्षा मंडळांच्या 12 वीच्या परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत होईल अशी शक्यता होती. परंतु परिक्षा रद्द करण्यासंबंधीचा निर्णय येत्या तीन ते चार दिवसांत घेतला जाण्याची शक्यता असून केंद्राप्रमाणेच राज्यातील 12 वी विद्यार्थ्यांनाही परिक्षेतून सुट मिळू शकते.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने चर्चा झाली असून सर्व जणांचे ह्या परिक्षा रद्द करण्यात याव्यात असे मत आहे. तसेच शालेय शिक्षणंमत्र्यांनी राज्यांनी घेतलेल्या परीक्षांच्या निर्णयाची माहिती संपूर्ण मंत्रिमंडळाला बैठकी दरम्यान दिली.

- Advertisement -

“शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ह्या संदर्भातील प्रस्ताव पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही तो प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला आहे”, असे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

केंद्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत त्यांनी राज्य शासनाचा मुलांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य आहे, त्यामुळे लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.