राज्यातील हॉटेल्स मॉल्सला रात्री 10 पर्यंत परवानगी ? थिएटर, नाट्यगृहे मात्र बंदच.

0

- Advertisement -

मुंबई: कोरोनाची लाट आटोक्यात आल्यामुळे बाजारपेठा आणि लोकल सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. आता त्यापाठोपाठ मॉल्स उघडण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. उद्यापासून मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड लशीचे 2 डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. मॉल आणि हॉटेल दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, परंतु याबद्दल अधिकृत शासनादेश आज रात्री प्रशासनातर्फे काढला जाण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा झाली आहे.

मुंबई आणि पुण्यात हॉटेल आणि रेस्टॅारंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आता हा निर्णय राज्यात लागू करावा, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार आता  राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची वेळ 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहि्ती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली असली तरी अधिकृत शासनादेश आज रात्री काढला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तसंच, मॉल्स 50 टक्के आसन क्षमतेनं सुरू करण्यात यावे, अशी चर्चा सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.  बहुतेक मंत्र्यांनी याबाबत मॉल्स, हॉटेल्स सुरू करावे असं मत मांडले. त्यानंतर ज्या व्यक्ती कोरोना लशीचे दोन डोस घेतले आहे, त्यांना प्रवेश दिला जाईल.

परंतु, थिएटर, सिनेमागृह, नाट्यगृह, मंदिरं बंद राहणार आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.