महाराष्ट्र सरकारमुळे होतोय बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर, केंद्राचा धक्कादायक आरोप

0

- Advertisement -

नवी दिल्ली: मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) प्रकल्प कधी पूर्ण होईल? सध्या सरकारकडे यासाठी कोणतीही सुधारित अंतिम तारीख नाही. मात्र, केंद्राने म्हटले आहे की, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेळ मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. यासह, सरकारने या प्रकल्पाच्या विलंबासाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार असल्याचे सांगितले आहे. हा प्रकल्प 2023 च्या अखेरीस पूर्ण होणार होता. बुलेट ट्रेन कधी सुरू होणे अपेक्षित आहे आणि त्या ट्रेनचे व्यावसायिक ऑपरेशन कधीपासून सुरू होईल? असा प्रश्न दोन खासदारांच्या वतीने विचारण्यात आला.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले उत्तर…

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “कोविड -19 च्या प्रतिकूल प्रभावामुळे आणि महाराष्ट्रात भूसंपादन आणि हस्तांतरणाच्या मंद प्रगतीमुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे. अधिग्रहण प्रक्रिया जलद करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारकडून सर्व स्तरांवर नियमितपणे माहिती घेतली जात असून, महाराष्ट्रात भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण करण्याची सुधारित मर्यादा निश्चित केली जाऊ शकते.”

राज्यात भूसंपादन प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे

सध्याची परिस्थिती अशी आहे की, महाराष्ट्रात प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 432 हेक्टर जमिनीपैकी फक्त 25% जमीन आतापर्यंत प्राप्त झाली आहे. तर, गुजरात आणि दमण आणि दीवमध्ये 96% पेक्षा जास्त जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी एकूण 75% जमीनचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

आतापर्यंत 14 हजार कोटीपेक्षा जास्त खर्च:

- Advertisement -

रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, 2021-22 मध्ये या प्रकल्पासाठी 14,000 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. तसेच चालू वर्षात आतापर्यंत 2 हजार 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच आतापर्यंत एकूण 14 हजार 153 कोटी खर्च करण्यात आला आहे.

बुलेट ट्रेन आमची प्राथमिकता नाही: उद्धव ठाकरे

योगायोगाने, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या  (PRAGATI) आढावा बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारला 30 एप्रिल 2021 पर्यंत प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जमीन संपादित करण्यास आणि ताब्यात देण्यास सांगितले होते. तोपर्यंत फक्त 22% जमीन संपादित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी म्हटले होते की हा प्रकल्प आमच्या सरकारसाठी प्राथमिक प्राधान्य नाही. तसेच शिवसेनेने याला व्हॅनिटी प्रोजेक्ट म्हटले होते. पक्षाने म्हटले होते की, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान अगोदरच उत्तम रेल्वे संपर्क आहे.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.