डेल्टा प्लस व्हेरिएंटचा महाराष्ट्रालाच का आहे सर्वाधिक धोका? केंद्राने सांगितले कारण

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोविडच्या दोन्ही लाटेत सर्वात जास्त नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. पहिल्या लाटेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते, तसेच दुसर्‍या लाटेतही कोरोनाने महाराष्ट्रात सर्वात जास्त गोंधळ माजवला होता. आता तज्ञ पुन्हा एकदा राज्यात तिसरी लाट येणार असल्याची सूचना देत आहेत. याचे कारण डेल्टा+ स्वरूप आहे.

राज्यात जर तिसरी लाट आली तर किमान 50 लाख लोकांना संसर्ग होईल असा अंदाज आहे. त्यात 10 % मुलांची संख्या असू शकते. सध्या हा फक्त अंदाज असून सरकार या मुद्द्यांवर तज्ञांशी चर्चा करत आहे. या सर्व शक्यतांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी सांगितले की, “कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत सक्रीय रूग्णांची संख्या आठ लाख असू शकते. तसेच  पाच लाख मुलांना संसर्ग होऊ शकतो, त्यापैकी अडीच लाख मुलांना सरकारी रूग्णालयात दाखल करावे लागू शकते.”

अखेर महाराष्ट्रावरच जास्त धोका कशामुळे?

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महाराष्ट्राला जास्त धोका असू शकतो आणि त्यामुळे राज्य आधीच सतर्क आहे. लव्ह अग्रवाल म्हणाले, “उत्परिवर्तनामुळे जीवंत व्हायरसची संख्या लक्षणीय वाढते आणि जेव्हा कोरोनाचे जास्त रुग्ण वाढतात तेव्हा धोका जास्त वाढतो. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे विषाणूची संख्याही जास्त आहे, येथे जास्त प्रमाणात विषाणूमध्ये उत्परिवर्तन होते. त्यामुळे महाराष्ट्राला डेल्टा+ स्वरूपाचा सर्वात जास्त धोका आहे.”

या जिल्हयांनी वाढवली चिंता

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाच टक्क्यांहून अधिक सकारात्मकता दर आहे, जो चिंताजनक आहे. रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, पालघर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात 5 टक्के पेक्षा जास्त पॉजिटिविटी दर आहे.”

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारने पुन्हा काही भागात निर्बंध लावून चांगले पाऊल उचलल्याचेही भार्गव यांनी म्हटले आहे.

देशात सध्या 40 पेक्षा जास्त डेल्टा प्लसची प्रकरणे सापडली असून त्यापैकी सर्वात जास्त 21 प्रकरणे महाराष्ट्रात आढळली आहेत. राज्यात सापडलेल्या 21 रुग्णांपैकी एकाचा काल मृत्यू झाला आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.