राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणा-यांना RT-PCR चाचणी बंधनकारक – शासनाचे नवे आदेश

0

- Advertisement -

मुंबई: तिसरी लाट (Third Wave of corona) लवकरच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यने याच पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवास (Inter-national travelers ) करुन राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने अनेक नियम जारी करत ते लागू देखील केले आहेत. याबाबत राज्य शासनाने देखील पत्रक काढले आहेत.

आता केंद्र सरकारच्या (Central Government)  नियमांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले असले तरी सुद्धा त्यांना आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR Test) करणे बंधकारक आहे. हा नियम आता महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) देखील लागू केला आहे. त्यामुळे यापुढे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary of State Sitaram Kunte) यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये, ‘मिडल ईस्ट, युरोप आणि साऊथ अफ्रिका याठिकाणावरुन येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असले तरी सुद्धा या नागरिकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे.’ असे म्हटले आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.