मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईला धुतले

0

- Advertisement -

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात दिलेला अतिवृष्टीचा इशारा खरा ठरला असून मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबई शहराला अक्षरशः धुतले आहे. हवामान विभागाने 9 जून ते 13 जून दरम्यान कोकणातील जिल्ह्यांसह मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा शनिवारी दिला होता. त्यानुसार आज (9 जून) मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

पहिल्याच पावसात मुंबतील दादर, मानखुर्द, सायन परिसरासह इतर सखल भागांत पाणी तुंबले आहे. जोरदार पाऊस होत असल्याने रेल्वे ट्रॅक पाणीखाली गेला असून अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी साचले आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

मुंबईसह उपनगरातही मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरापैकी अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरात देखील संततधार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई येथेही मुसळधार पाऊस कोसळत आहे.

तर रायगड जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली असून खोपोली, अलिबाग, महाड, उरण परिसरात मुसळधार सुरू आहे. पनवेल परिसरातही जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री घेत आहेत आढावा

- Advertisement -

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत  काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर  जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील जिल्ह्यात पुढील 3 दिवसांत मध्यम ते तीव्र पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

तसेच मुंबईत पंपिंग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेल्या पाण्याचा लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे. तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी  वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.