अखेर बारावीचा निकाल लागणार, उद्या दुपारी 4 वाजता होणार जाहीर

0

- Advertisement -

मुंबई : राज्यातील दहावीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकाल 30 जुलैला लागेल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु तो जाहीर न झाल्याने त्याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. मात्र विद्यार्थी आणि पालकांची ही उत्सुकता आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा ने संपविली आहे.  इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार असल्याचे अधिकृतरित्या मंडळाने जाहीर केले आहे. निकालापूर्वी मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांकही जाहीर करण्यात आले असून http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थांना आपला बैठक क्रमांक मिळवू शकतो.

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करून दहावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन करण्यात आले आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत 12 वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

हा निकाल जाहीर करताना मात्र दहावीच्या निकालावेळी झालेली गडबड लक्षात घेता मंडळाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेबसाईटवर निकाल जाहीर करण्याऐवजी आता चार वेगवेगळ्या वेबसाईटवर विद्यार्थांना निकाल पाहता येईल तसेच सदर निकालाची प्रत (प्रिंट ) घेता येईल.

 

निकाल कुठे पाहायचा?

  1. https://hscresult.11 thadmission.org.in
  2. https://msbshse.co.in
  3. hscresult.mkcl.org
  4. mahresult.nic.in.  

- Advertisement -

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

 

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

किंवा Telegram चॅनल: https://t.me/Deccanviews मध्ये सहभागी व्हा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.