महाविकास आघाडी सरकार पूर्ण 5 वर्ष चालेल, कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेत पडणार नाही फुट – संजय राऊत

0

- Advertisement -

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत पुन्हा युती होऊ शकते या वृत्ताला बळ मिळाले होते. याचे एक कारण म्हणजे या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसवर अनेक हल्ले केले होते. अशा परिस्थितीत शिवसेनेने कॉंग्रेसशी संबंध तोडणार तर नाही याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आज सोमवारी (21 जून) वृत्त संस्था एएनआयआय शी बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, हे महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे. ते म्हणाले, “शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकजूट आहेत. आम्ही आमचे सरकार पूर्ण 5 वर्ष चालवण्यास कटिबद्ध आहोत. ज्या बाहेरच्या पक्षाला सरकार बनवयाचे आहे, त्यांनी खुशाल तसे प्रयत्न करावे, परंतु आमचे महाविकास आघाडी सरकार चालतच राहील.”

संजय राऊत पुढे म्हणाले, ‘शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न होतील, पण त्यात त्यांना यश मिळणार नाही.’

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केले होते स्वबळावर निवडणूक लढवण्याचे वक्तव्य

- Advertisement -

तत्पूर्वी, कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले होते की, काँग्रेस पुढील निवडणुका एकट्याने लढू शकते. यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे म्हटले होते.

रविवारी नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते की, जोपर्यंत महाविकास आघाडीचा कार्यकाल पूर्ण होत नाही तोपर्यंत कॉंग्रेसचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा राहील आणि कॉंग्रेसकडून महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसणार आहे. सोनिया गांधी यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन दिले होते. त्यात नंतर एकत्र निवडणुका लढण्याबाबत कोणतीही गोष्ट झाली नाही.”

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.