महाराष्ट्रातील लॉकडाउनसदृश निर्बंध दोन आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय

0

- Advertisement -

मुंबई. महाराष्ट्रातील लॉकडाउनसदृश निर्बंधांची 14 दिवसांची मुदतवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, पूर्वी जारी केलेल्या आदेशानुसार 1 जूनला लॉकडाउन संपत आहे. परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाउनसदृश निर्बंधांना 14 दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार लवकरच यासंदर्भात आदेश जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.

वेगवेगळ्या जिल्हयातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार

राजेश टोपे म्हणाले, राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आता नियंत्रणात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोविड पॉजिटिव दर जास्त आहे किंवा बेडच्या उपलब्धतेत समस्या आहेत अशा जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन आम्हाला वाढवायचे आहे. परिस्थितीनुसार आम्ही काही ठिकाणी निर्बंधात सूट देऊ शकतो. राज्यात बरे होण्याचा दर 93 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. काल (गुरुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली.

- Advertisement -

नुकतीच राजेश टोपे यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी त्यांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात नागरिकांची लूट करणाऱ्या रुग्णालयांनाही इशारा दिला आहे. तसेच रुग्णालयांकडून कोरोना उपचारांसाठी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलाचे ऑडिटरमार्फत ऑडिट केले जाईल, असे राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. आत्तापर्यंत फक्त दीड लाख रुपयांच्या वरच्या बिलांचेच ऑडिट केले जात होते. मात्र, आता प्रत्येक बिलाचे ऑडिट केले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.