मान्सूनसाठी पोषक वातावरण: पुढील 3 दिवस राज्यात पावसाचे

0

- Advertisement -

मुंबई: येत्या तीन दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज बुधवारी हवामान विभागाने वर्तविली आहे. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला असून राज्यात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी येलो अर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील जवळपास तीन आठवड्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात पावसाने विलंब केला असल्याने अनेक ठिकाणी पिके करपण्यास सुरवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. परंतु आता पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पावसासाठी (Monsoon In Maharashtra) पोषक हवामान तयार झाले आहे. त्याचा परिणाम स्वरुप महाराष्ट्रात पावसाची स्थिती  निर्माण झाली आहे. ही स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.