बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण: खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा

0

- Advertisement -

नवी दिल्ली: अमरावतीच्या अपक्ष खासदार आणि अभिनेत्री नवनीत कौर यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टानेही याचिकाकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत.

न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या 8 जून रोजी दिलेल्या आदेशाला स्थगिती देताना, ​​सर्व प्रतिवादींना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जून रोजी होईल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला नवनीत कौर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हायकोर्टाने नवनीत कौर यांचे जात प्रमाणपत्र बनावट घोषित केले होते. यासह हायकोर्टाने आपल्या निर्णयात नवनीत कौर यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. हायकोर्टाने ख्सदार नवनीत राणा यांना सर्व प्रमाणपत्रे सहा आठवड्यांत सादर करण्यास सांगितले होते. हायकोर्टाच्या आदेशामुळे नवनीत कौर यांचे लोकसभा सदस्यत्व धोक्यात आले होते.

- Advertisement -

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.