महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वीचा निकाल ‘या’ तारखेला होऊ शकतो घोषित

0

- Advertisement -

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील 10 वी बोर्ड परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल कोणत्या आधारावर काढला जाईल याकडे सर्वांचे लक्ष होतं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मूल्यांकन धोरण जाहीर केले आहे. मूल्यमापन धोरणाशी संबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वरून माहिती घेऊ शकतात.

खात्रीलायक सूत्रांनुसार, 10 विचा निकाल 15 जुलै रोजी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वीचा निकाल निकाल विद्यार्थ्याच्या 9 वी व 10 वीच्या अंतर्गत परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे घोषित केला जाईल.

असा असेल मूल्यांकन फॉर्म्युला

विद्यार्थ्याला 9 वीला पडलेल्या गुणांचे 50 टक्के, वर्ग 10 वी मध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षेच्या गुणांचे 30 टक्के तसेच 10 वीत झालेल्या प्रोजेक्टस इत्यादिचे 20 टक्के गुणांना मिळवून अंतिम निकाल तयार करण्यात येणार आहे.

11 वीत प्रवेशासाठी द्यावी लागेल CET

- Advertisement -

विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 14 दिवसानंतर राज्यात सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.