मुंबईतील बलात्कार पिडितेचा उपचारांदरम्यान मृत्यु

0

- Advertisement -

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर एका टेम्पोमध्ये 32 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना उघडकीस आली होती. या महिलेवर बलात्कारानंतर बेदम मारहाण करत तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड घुसविण्यात आला होता. तिला उपचारार्थ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पीडित महिलेची प्रकृती खूपच गंभीर होती. व्हेंटिलेटरवर तिच्यावर उपचार सुरु होते. अशामध्ये शनिवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाक्यातील खैरानी रोडवर एक महिला जखमी अवस्थेत पडल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत जखमी महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हींची (CCTV Footage) तपासणी केली तर त्यामध्ये आरोपी कैद झाला होता. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी मोहन चौहान (45 वर्षे) या आरोपीला काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.