नारायण राणे यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याबद्दल, शिवसेनेने भाजप नेत्यावर कारवाई करण्याची केली मागणी

0

- Advertisement -

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापून आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या नाटकीय अटकेनंतर राज्यात राजकीय शेरेबाजीला उत आला आहे. सर्व विरोधी पक्ष नेते महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. केंद्रीय य मंत्री नारायण राणे यांची राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे आमदार प्रमोद जठार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली.

नारायण राणे यांची छत्रपती संभाजी महाराज सोबत तुलना धक्कादायक

गुरुवारी पीटीआयशी बोलताना नाईक म्हणाले की, प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांची छत्रपती संभाजी महाराजांशी केलेली तुलना “धक्कादायक” आहे. यामुळे संभाजी महाराजांच्या लाखो अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. आमदार वैभव नाईक म्हणाले, ते बुधवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले होते आणि त्यांना जठारविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

काय म्हणाले होते जठार? 

छत्रपती संभाजी महाराज हे एक महान राजा होते. त्यांना संगमेश्वर (रत्नागिरी जिल्ह्यातील) येथे मुघल शासक औरंगजेबाने अटक केली आणि त्यांच्यावर अत्याचार केला. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर येथून अटक केली आहे. ज्याप्रमाणे मुघल साम्राज्याचा अंत झाला तसाच या सरकारचा होणार असल्याचे प्रमोद जठार म्हणाले होते.

- Advertisement -

2014 मध्ये नाईक यांनी राणे यांचा सिंधुदुर्गातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता. मुंबईतील वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही राणे यांचा शिवसेनेच्या उमेदवाराने पराभव केला होता.

नारायण राणे यांना अटक आणि जामिन

या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थापड मारण्याच्या राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. त्यांना मंगळवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आणि नंतर रायगडमधील महाड येथील न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांच्या या विधानाबाबत संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मंगळवारी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ एकमेकांशी भिडले होते.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.