राज्यात यंदाही दहीहंडी नाही, आरोग्याला प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0

- Advertisement -

मुंबई:  जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊन, मानवता दाखवूयात आणि कोरोनाला प्रथम हद्दपार करूयात असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Cm Uddhav Thackeray) महाराष्ट्रातील प्रमुख गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत केले आहे.

या महिन्याच्या शेवटी होणा-या गोपाळकाला अर्थात दहिहंडी उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई, पुणे तसेच राज्यभरातील अनेक गोविंदा पथकांनी तसेच आयोजन करणा-या मंडळांनी केली होती. तसेच मुंबईतील दहिहंडी समन्वय समितीने  मुख्यमंत्र्यांकडे काही विनंत्या करीत परवानगीची मागणी केली होती. त्यात जागेवरच दहिहंडी फोडण्याची परवानगी, मानवी मनोरे उभारताना सर्व गोविंदांचे लसीकरण, गोविंदा पथक दुस-या कोणत्याही ठिकाणी हंडी फोडण्यास जाणार नाही, हंडी फोडताना सर्व गोविंदा मंडळ काळजी घेतील अशा विनंत्या होत्या.

परंतु आज या मंडळांच्या समन्वय समितीसोबत झालेल्या बैठकीत ऑनलाईन संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहिजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल. आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूयात. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपल्या संस्कृती परंपरा देखील काहीवेळ समजूतीने गर्दी टाळण्यासाठी टाळव्या लागतील. आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल.

- Advertisement -

दहीहंडी नतर लगेच गणेशोत्सव येणार आहे. आपण आता दहीहंडी उत्सवाला थोडी शिथिलता दिली तर पुढे गणेशोत्सव मंडळे देखील थोडी शिथिलता मागतील. त्यामुळे आपण आता सावध भूमिका घेतली पाहिजे, असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.