कोविड मृत्यु बदल्यात आर्थिक मदत मिळण्यासाठी मृत्यु प्रमाणपत्र देणे नाही गरजेचे !

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये कोविड महामारीत मृत्यु झालेल्यांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्राप्त अर्ज मंजूर करताना कोविडमुळे झालेल्या मृत्यु प्रमाणपत्राची गरज नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीतली वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिका-यांना कोविड -19 पीडितांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सहाय्य योजना मिळण्यासाठी अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

साथीच्या आजारांमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना थोडासा दिलासा देत केजरीवाल यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना विचारले की, अर्जदाराने आता मृत्यू प्रमाणपत्र आणि ‘हयात सदस्य प्रमाणपत्र’ सादर करण्याची गरज नाही. ते फक्त नोंदींमधून नावांची पडताळणी करू शकतात आणि तत्काळ मुख्यमंत्री कोविड -19 परिवार आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक नुकसानभरपाई देऊ शकतात, असे ते म्हणाले.

कोरोना महामारीत अनेक लोक बळी पडले आहेत. कागदपत्र पुर्ततेच्या निमित्ताने त्यांना त्रास देण्यात येऊ नये. कामकाजात दिरंगाई अजिबात सहन केली जाणार नाही. या योजनेचा हेतू आहे की कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांच्या नुकसानाबद्दल त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान कराणे तो पुर्ण झाला पाहिजे असे ते म्हणाले.

- Advertisement -

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योजनेअंतर्गत भरपाईच्या संथगतीने सुरु असलेल्या वितरणावर प्रकाश टाकण्यासाठी एका लाभार्थीला बैठकीत आणले होते. अशा प्रकरणांमध्ये दिरंगाई होऊ नये अशा सरकारच्या स्पष्ट सूचना असूनही अर्ज मंजूर होण्यासाठी लाभार्थ्यांची कशी धावपळ होते, याविषयी पीडितेने थेट अधिका-यांना बैठकीतच  सांगितले.

आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्य सचिव विजय देव हे ही उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, योजनेअंतर्गत 50,000 रुपयांच्या एक वेळच्या सानुग्रह मदत (एक्स ग्रेशिया) रकमेसाठी 25 हजार 709 अर्ज प्राप्त झाले आहेत.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.