गुड न्यूज; महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत घट

0

- Advertisement -

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या ही स्थिर होत असल्याचे चित्र होते, त्यात आणखी दिलासादायक बातमी म्हणजे राज्यातील रुग्णसंख्या काल 2 मे रोजी गेल्या 24 तासांत घटली असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.  राज्यातील रुग्णसंख्येत शनिवारच्या तुलनेत रविवारी कमालीची घट झाली आहे. तसेच, करोनाबाधित मृतांचा आकडाही नियंत्रणात आला असल्याचे चित्र आहे.

 

राज्यात सलग काही दिवस ६० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळत होते. पण रविवार २ मे २०२१ रोजी राज्यात २४ तासांत ५६ हजार ६४७ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय असून गेल्या 24 तासांत ५१ हजार ३५६ रुग्ण बरे झाले. रुग्णबरे होण्याचे प्रमाण ८४. ३१ टक्के इतके झाले आहे.

 

कोरोनामुळे राज्यात २४ तासांत ६६९ मृत्यू झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १. ४९ टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७० हजार २८४ रुग्णांचे करोनामुळं प्राण दगावले आहेत.

- Advertisement -

सध्या राज्यात ३९ लाख ९६ हजार ९४६ जण होमक्वारंटाइन तर २७ हजार ७३५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.