सावधान ! साईबाबा संस्थानच्या नावाने भाविकांची होतेय ऑनलाईन फसवणूक

0

- Advertisement -

शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा संस्थान ट्रस्टच्या नावाने भाविकांकडून ऑनलाईन देणग्या गोळा करून भाविकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले, अशी माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बागटे यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी संस्थानच्या अधिका-यांकडे काही अज्ञात व्यक्ती मंदिराचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक माध्यमांद्वारे दान स्वरुपात देणग्या देण्याची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले.

पूजा, आरती, प्रसाद इत्यादींसाठी सर्वसामान्यांकडून देणगी मिळावी अशी मागणी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इतर सामाजिक माध्यमांवरील काही गटांतील संदेशांची माहिती संस्थानला मिळाली. त्यात प्राथमिक चौकशी केली असता देणग्या मागणारे असे संदेश फसवे असून जाणूनबूजुन काही व्यक्ती आहेत अशा प्रकारे भक्तांची फसवणूक करीत असल्याचे दिसून आले आहे असे एकनाथ गोंदकर यांनी सांगितले आहे.

कोविड प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने दिलेल्या आदेशान्वये श्री साईबाबा समाधी मंदिर सर्व भाविकांसाठी 5 एप्रिलपासून आहे. तरीही, या परिस्थितीत, श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी या नावाने ओळखल्या जाणार्‍या शिर्डीतील बनावट आणि अज्ञात संस्था गुरुवार अन्नदान खात्यात ऑनलाईन, पेटीएम आणि गुगल पे प्रकारच्या पेमेंट सेवांद्वारे भक्तांसाठी ऑनलाईन देणगीची मागणी करीत असल्याचे आढळले असल्याचे श्री. बगाटे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

श्री साईबाबांच्या संस्थान अशा कोणत्याही कार्याशी किंवा अन्नादानशी आणि अन्य कोणत्याही संस्थेशी जोडलेले नाही, किंवा पेटीएम, गूगलपे इत्यादी माध्यमातून ऑनलाइन देणग्या गोळा कऱण्याशीही संस्थानचा संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच काही फसव्या संघटना एकसारखे किंवा समानार्थी नावे वापरत आहेत आणि त्यांच्या वेबसाइट, फेसबुक पेजेस किंवा इतर सामाजिक माध्यमांतील अकाउंट्सद्वारे भाविकांकडून ऑनलाइन किंवा रोख स्वरुपात देणग्या जमा करून त्यांची फसवणूक करताहेत त्यामुळे भाविकांनी अशा बनावच व नामसाधर्म्य असलेल्या बोगस संस्थांना त्वरीत ओळखावे व त्याच्याबरोबर व्यवहार करणे टाळावे असा सावधानतेचा इशारा बागटे यांनी दिला आहे.

अधिक चौकशी केल्यानंतर संस्थानचे नाव वापरून करीत असलेल्या फसवणूकीतील लोकांना ओळखले जाऊ शकते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो यासाठी संस्थान औपचारिकपणे पोलिस तक्रार नोंदविण्याचा विचार करीत असल्याचे गोंदकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिर्डी संस्थानने भाविक जनतेला, या घोटाळ्यांबाबत देणग्यांसाठी अशा प्रकारच्या आवाहनांना प्रतिसाद देण्यापूर्वी केवळ त्यांच्या अधिकृत वेबसाइट किंवा ईमेलद्वारे ट्रस्टच्या अधिका-यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.