8 कोटीची गाडी खरेदी करणार्‍या उद्योजकावर वीजचोरीचा आरोप, जाणून घ्या सविस्तर माहिती

0

- Advertisement -

कल्याण: कल्याणमधील प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी 8 कोटीची रोल्स रॉयस कार विकत घेतल्याने चर्चेत होते. ते आता पुन्हा चर्चेत आले असून, यावेळी कारण वेगळे आहे. त्यांच्यावर वीजचोरीचा आरोप करत FIR दाखल करण्यात आली.

FIR दाखल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी दंडासह थकित वीजबिल भरले असल्याची माहिती समोर येत आहे. संजय गायकवाड यांनी वीजचोरीचा आरोप फेटाळत वीज कंपनीवर खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) कल्याणचे उद्योजक संजय गायकवाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. महावितरणच्या भरारी पथकाने संजय गायकवाड यांच्या बांधकाम स्थळांची पाहणी केली होती. या पाहणीत बांधकाम स्थळी वीज चोरी होत असल्याचे पथकाला आढळून आले. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंधे यांनी केले.

- Advertisement -

या कारवाईनंतर महावितरण कंपनीने संजय गायकवाड यांना 34,840 रुपयांचे बिल पाठविले आणि त्यांच्यावर 15,000 रुपये दंडही लावण्यात आला. बुंधे यांनी गेल्या आठवड्यात तीन महिन्यांपासून पैसे न भरल्याबद्दल त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती.

महावितरणचे प्रवक्ते विजयसिंह दूधभाटे यांनी सांगितले की, पोलिसांनी एफआयआर नोंदविल्यानंतर गायकवाड यांनी दंडासह संपूर्ण बिल भरले आहे. दूधभाटे पुढे म्हणाले की, वीज चोरी केल्यास तीन वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड किंवा दोन्ही होऊ शकते. संजय गायकवाड यांनी थकित वीजबिल आणि दंड भरल्यामुळे तक्रार मागे घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संजय गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.