पुणे महापालिकेने वाढविली म्युकरमयकोसिसच्या उपचारांसाठी आर्थिक मदत; गरीब रुग्णांना होणार फायदा

0

- Advertisement -

शहरी गरीब योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारांसाठी केली जाणारी आर्थिक मदत आता 1 लाखावरुन 3 लाख रुपये करण्याचा निर्णय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या दळवी रुग्णालयात फक्त म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी 15 बेड राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. शिवाय पुणे महापालिका नेत्रतज्ज्ञ आणि घसातज्ज्ञांचीही भरती करणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक 318 रुग्ण असून आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

- Advertisement -

ससून रुग्णालयामध्ये स्वतंत्र वार्ड 50 ऑक्सिजन बेड आणि 10 आयसीयू बेड आणि स्वतंत्र ऑपरेशन थिएटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णासाठी 10 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड मध्येही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले असून या आजारामुळे 12 रुग्ण दगावले असल्याची माहीती समोर येते आहे. दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले असल्याचे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॅाक्टरांनी म्हटले आहे.

राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे म्युकर मायकोसिसच्या रुग्णसंख्येत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात आतापर्यंत 318 जणांना म्युकर मायकोसिसची लागण झाली असून 20 जणांचा बळी गेला आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.