माजी खासदार संजय काकडे यांना अटक

0

- Advertisement -

पुणे: येथील भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर शेकडो कारचा सहभाग असलेली रॅली काढली होती. त्यात काकडे यांच्या गाड्यांचा सहभाग असल्याने त्यांना अटक केली असून आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

कुख्यात गुंड गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर त्याचा समर्थकांनी शेकडो कार्स सह त्याची पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावरून जंगी मिरवणूक काढली होती. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात काकडे यांना चौकशीसाठी बोलावले असता बुधवारी सकाळी बंडगार्डन पोलिसांनी काकडे यांना अटक केली.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.