संजय राऊत म्हणाले, विरोधक हे ब्लॅक फंगस, भाजप म्हणतं, तो तर दीड वर्षापूर्वीच महाराष्ट्राला लागलाय!

0

- Advertisement -

राज्यात कोरोनासोबतच म्युकोरमायकोसिस (Black Fungus) आजाराने पाय पसरले आहेत. राज्यात सध्या 2000 पेक्षा जास्त म्युकोरमायकोसिसचे सक्रीय रुग्ण आहेत. या आजाराच्या उपचारासाठी लागणार्‍या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितही काही विरोधक राजकारण करताना दिसून येत आहेत. यामुळे संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंगस असल्याची जहरी टीका केली. यामुळे वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.

पुण्यात एका कोविड सेंटरच्या उद्घाटनवेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थिती एकदम चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनी देखील राज्याचे कौतुक केले आहे. मात्र, तरीही राज्यातील विरोधक टीका करत असतात म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कामाकडे लक्ष द्या, कारण विरोधक हे ब्लॅक फंगस आहेत.

संजय राऊत यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेचे भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, बोरु बहाद्दर म्हणतात विरोधक ब्लॅक फंगस आहेत. अच्छा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायम कडी लावून आणि दडी मारुन घरी बसलेले असतात काय? लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला’

- Advertisement -

प्रसाद लाड यांनीही दिले प्रत्युतर

महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला असल्याचा पलटवार लाड यांनी केलाय. तसंच बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही लाड यांनी राऊतांना दिलाय.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.