राज्यातील सर्व महाविद्यालयांतही होणार शिवस्वराज्य दिन साजरा

0

- Advertisement -

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दि. 6 जून हा दिवस सर्व महाविद्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त  दिनांक 6 जून हा दिवस सर्व महाविद्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानुसार  राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार  आहे. याबद्दलचे शासन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.