राज्यातील रंगकर्मीच्या कल्याणकारी मंडळासाठी राज्य़ शासनाचा पुढाकार

0

- Advertisement -

मुंबई: राज्यातील माथाडी कामगारांसाठी वेगवेगळी मंडळे आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रात वेगवेगळया कलाक्षेत्रात अनेक कलाकार काम करीत आहे. या सर्व रंगकर्मीसाठी हे कल्याणकारी मंडळ काम करणार असून हे मंडळ लवकर स्थापन होण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील असून, राज्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हास्तरावर करण्यात येत असले तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरु करता येईल याबाबत काय प्रयत्न करता येतील अशी सुचना राज्यातील विविध कला क्षेत्रातील रंगकर्मीशी देशमुख यांनी केली आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून राज्य शासनामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असली तरी या कार्यक्रमांवर बंदी ही कलाकार आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

म्हाडा आणिस सिडकोच्या घरांमध्ये रंगकर्मीसाठी राखीव ठेवलेल्या सदनिकांमध्ये मुंबईमध्ये 5 टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 2 टक्के प्रमाण असावे अशी मागणी आपण यापूर्वीच राज्य शासनाकडे केली असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले आहे.

रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र या संस्थेतर्फे काही कायमस्वरुपी मागण्या करीत असलेले पत्रक सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांना देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील रंगकर्मीची नोंद होणे, कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींमध्ये शिथिलता आणणे, असंघटित रंगकर्मीसाठी रंगकर्मी बोर्ड स्थापन करणे, वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी, एकपात्री किंवा दोनपात्री कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी,अटी व नियमांचे पालन करुन रंगकर्मींना कला सादर करण्याची परवानगी अशा काही मागण्या यावेळी रंगकर्मीनी श्री. देशमुख यांना केल्या.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.