राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढल्यास कठोर निर्बंध ?

0

- Advertisement -

पुणे: राज्यातील वाढत असलेल्या करोना संसर्गामुळे जर 700 मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज अथवा मागणी निर्माण झाल्यास राज्यातील जनतेला लॉकडाऊन सारख्या कठोर निर्बंधाला सामोरं जावे लागेल, तसा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे.

“करोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेतात. त्याच्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. परंतु रूग्ण संख्या वाढत आहे तसेच बहुतेक जण घरीच थांबून उपाचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहेत. परंतु, हे होत असताना उद्या जर जास्त प्रमाणात ऑक्सिजन बेड्सची मागणी सुरू झाली आणि ७०० मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची राज्यात मागणी झाली तर मग मात्र त्या संदर्भात मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.” असे पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अतिशय व्यवस्थित सुरू आहे. आम्ही सगळेच जण त्यांचे सहकारी या नात्याने एक टीम म्हणून काम करत आहोत. अधिकारी देखील काम करत आहेत. मुख्यमंत्री देखील दररोज आढावा घेत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही, असे पवार, मुख्यमंत्री पंतप्रधानांसमवेतच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यावर सध्या भाजपाकडून सुरू असलेल्या टिकेला उत्तर देताना म्हणाले.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.