शाळांची सुट्टी; १ मे ते १३ जून शाळा राहणार बंद

0

- Advertisement -

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १३ जून तर विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.  गेले वर्षभर शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे परंतु मध्यंतरी काही माध्यमिक शाळा ऑफलाइन सुरू करण्याचे प्रयत्न शालेय शिक्षण विभागाद्वारे केले गेले होते, नंतर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  तेही वर्ग पुन्हा बंद झाले होते.

 

- Advertisement -

‘शनिवार १ मे २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आल्या आहेत. सुट्टीचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा. पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान पाहता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील.’ असे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा सध्याच्या करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्ग ऑनलाइनच होणार आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळांबाबच स्थानिक कोविड स्थितीनुसार निर्णय घ्यावा असेही त्यात म्हटले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.