कोरोनातून सावरणार्‍या मुंबईपुढे आता नवीन संकट, सापडले ‘स्वाईन फ्लू’ चे रुग्ण

0

- Advertisement -

मुंबई: देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मुंबईमध्येही कोरोना शांत होत आहे. मात्र, आता मुंबईपुढे आता एक नवे संकट उभे राहिले आहे. मुंबई मध्ये आता स्वाईन फ्लू आजाराचे नवीन प्रकरणे समोर येत आहेत. स्वाईन फ्लू आणि कोविड-19 आजारांची लक्षणे सारखीच असतात, त्यामुळे विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांनी केले आहे. स्वाईन फ्लू च्या रुग्णांना कोविड-19 चा उपचार देण्यात येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ वसंत नागवेकर यांनी नुकतीच सर्दी, ताप आणि डोकेदुखीच्या दोन रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी एक रुग्ण नुकताच कोविड-19 मधून बरा झाला होता. कोणत्याही बरे झालेल्या कोविड रूग्णाला 90 दिवसांच्या आत पुन्हा कोविड संसर्ग होणे दुर्मिळ आहे. त्यामुळे डॉक्टरांनी H1N1 चाचणी सुचविली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्या रुग्णाची H1N1 चाचणी सकारात्मक आली.

अहवालानुसार डॉ. नागवेकर म्हणाले की, “उपचारादरम्यान हे लक्षात ठेवले पाहिजे की सध्या बर्‍याच प्रकारचे विषाणू पसरत आहेत. अशा परिस्थितीत, एखादा रुग्ण कोविड प्रोटोकॉलद्वारे दिलेल्या उपचारातून बरे होत नसेल तर इतर चाचण्या करून पहा.”

आरोग्य विभागानेही केली पुष्टी

- Advertisement -

बीएमसीच्या आरोग्य विभागानेही 2 स्वाईन फ्लू चे रुग्ण सापडल्याची पुष्टी केली आहे. मागील काही वर्षात मुंबईत H1N1 चे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी मुंबईत 44 प्रकरणे नोंदली गेली. सन 2019 मध्ये H1N1 चे 451 रुग्ण आढळले आणि त्यात 5 मृत्यू झाले होते.

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव म्हणाले की H1N1 आणि कोविड-19 दोन्ही श्वसनसंबंधी आजार असल्यामुळे योग्य निदान करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की दोघांच्याही लक्षणांमध्ये बरीच समानता आहेत, परंतु विषाणूमध्ये फरक आहे. त्यामुळे रुग्णांवर चुकीचा उपचार करण्यात येणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.