उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्या – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0

- Advertisement -

मुंबई: शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार उघडतो आहोत. मात्र, मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. माझे विद्यार्थी माझी जबाबदारी उपक्रमाच्या उद्घाटनास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही उपस्थित होत्या.

टागोरांनी उघडलेल्या शांतिनिकेतन या खुल्या शाळेचा दाखला, शाळेची दारे खिडक्या उघड्या ठेवा. हसतीखेळती मुले तशीच खेळती हवा हवीच. शाळेत निर्जंतुवणूकीकरण करा. मुलांमध्ये अंतर ठेवा. त्यांना मास्क लावायला सांगा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि पालकांशी बोलताना केले.

राज्यातील शाळा तब्बल दिड वर्षानंतर उघडल्या असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना शुभेच्छा दिल्या. ‘विद्यार्थी हे आपले आधारस्तंभ आहेत. त्यांची काळजी घ्या, असं सांगतानाच एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होणार नाहीत असा निर्धार करा,’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही या निर्धारानं आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया, असेही ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे त्यामुळे ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ याची सुरुवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ पासून सुरुवात झाली. आज शाळेचं दार उघडलं आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचं दार उघडलं आहे. माझी शिक्षक आणि पालकांना विनंती आहे, आपल्या पाल्याची जबाबदारी व्यवस्थितपणे घ्या आम्ही सोबत आहोत. एखाद्या शिक्षकाची तब्येत बिघडली असल्यास त्यांनी टेस्ट करुन घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यास तातडीनं उपचार करुन घ्यावेत. प्रत्येक सीझनमध्ये आजार येतात. आता ऑक्टोबर हीट येईल. त्यामुळे कोरोना तर नाही ना याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.