ठाण्यातील महिलेला 15 मिनिटांत 3 लसीचे डोस मिळाल्याचा दावा, प्रशासनाने दिले चौकशीचे आश्वासन

0

- Advertisement -

ठाणे: देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीच्या कमतरतेमुळे बर्‍याच लोकांना लस बूक करायला स्लॉट उपलब्ध होत नाहीत. मात्र, असे असतांनाही एका महिलेने तिला 15 मिनिटात 3 डोस दिल्याचा दावा केला आहे. महिलेच्या या धक्कादायक दाव्यामुळे तेथील प्रशासनाचे ढाबे दणाणले आहेत. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आश्वासन दिले आहे. मात्र, महिलेला 3 डोस देण्याच्या दाव्याचे खंडन केले आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, महिलेच्या पटीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “मी शुक्रवारी माझ्या पत्नीला घेऊन लसीकरण केंद्रावर गेलो होतो. तिथे तिला लस टोचण्यात येणार होती. लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिने म्हटले की, तिला लसीचे 3 डोस देण्यात आले आहेत.”

दरम्यान, सोमवारी ठाण्यात कोविड-19 चे 480 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या 5,31,200 झाली आहे. तसेच 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या वाढून 10,465 झाली आहे. ठाणे जिल्ह्यात मृत्युदार 2 टक्के आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.