कोविड-19: राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यातून येत आहेत 50 टक्के पेक्षा जास्त नवीन रुग्ण

0

- Advertisement -

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. परंतु चिंतेची बाब म्हणजे कोरोनाची नवीन प्रकरणे ग्रामीण भागातून जास्त येत आहेत आणि तीही मुख्यत: 9 जिल्ह्यांमधून. रविवारी राज्यात कोरोना विषाणूची 9,361 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 190 मृत्यू झाले. त्यापैकी रायगड, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 5,194 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.

मागील काही दिवसांत या 9 जिल्ह्यातूनच 50% पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. तथापि, येत्या काही दिवसांत ही संख्या खाली येईल, असे राज्याचे आरोग्य विभाग आणि तज्ज्ञांचे मत आहे. रविवारी रत्नागिरीमध्ये 761, सातार्‍यात 7२8, कोल्हापूर ग्रामीण 725, रायगडमध्ये 643, पुणे ग्रामीण 579, सांगली ग्रामीण 572, अहमदनगर ग्रामीणमध्ये 549, सिंधुदुर्गात 329 आणि सोलापूर ग्रामीणमध्ये 308 रुग्ण आढळले. रविवारी या क्षेत्रातून 55.48% नवीन रुग्ण आढळले आहेत.

काय आहे कारण?

- Advertisement -

माजी आरोग्य सेवा महासंचालक आणि कोविड -19 चे राज्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, “पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी व सिंधदुर्ग येथे राज्यातील उर्वरित भागासारखे कोरोनाची प्रकरणे कमी होत नसून, या क्षेत्रात विषाणूचा उशिरा प्रवेश झालेला असू शकतो.”

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.