विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच……

0

- Advertisement -

मुंबई: महाराष्ट्रातल्या १३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत, असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

याबाबत सर्व विद्यापिठांच्या कुलगुरूंसोबत बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, ‘काही ठिकाण ऑनलाईनचा पर्याय निवडला होता. पण निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घरातून बाहेर पडणे मुश्किल होणार आहे. म्हणून आम्ही सर्वानुमते असा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या १३ अकृषी विद्यापिठांमध्ये उर्वरित असलेल्या सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेता येतील. ऑनलाईन परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण निर्माण होत असेल त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती १३ ही विद्यापिठांच्या कुलगुरुंना केली आहे.

- Advertisement -

काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत पारंपारीक पद्घतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या परंतु आता कोणत्याही विद्यापीठाला ते शक्य नसल्याचे विद्यापीठांच्या कुलगुरूंनी शासनाला विनंती केली होती, म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यांतील विविध विद्यापीठांमार्फत महाविद्यालयातील तरुणांना लसीकरण करण्याचा विचार करीत असल्याचे सांगून एनएसएस आणि एनसीसी च्या विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीमेत सहभागी करून घेण्याचाही विचार आहे असे ते म्हणाले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.