पुरवठाच झाला नाही तर लसीकरण यशस्वी कसे होईल – राजेश टोपे

मोफत लसीकरणाबद्दल उद्याच्या कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय.

0

- Advertisement -

मुंबई: लसीचा पुरेसा पुरवठाच होत नसल्याने 18 वर्षावरील सर्वांना लस देणे शक्य होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

केंद्राने सर्व राज्यांना येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लसीचा पुरवठाही आवश्यक असून राज्याचा मात्र 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांनाच तसेच सुरु असलेले लसीकरण मोहीतील नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न राहणार आहे. टोपे यांच्या या सवालामुळे मोफत लसीकरणावर प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.

सध्या राज्यात मोफत लसीकरणाबाबत जोरदार चर्चा असून त्यावरून श्रेयवाद ही रंगला आहे. या पार्श्वभुमीवर टोपेंनी उद्या होणा-या कॅबिनेटच्या बैठकीत काय ते ठरेल. तसेच कॅबिनेटला तसा अहवाल देण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. असे सांगितले आहे.

लसीकरण करण्यासाठी लसींची आयात करण्याचा आमचा विचार आहे. सीरम आणि भारत  बायोटेक कंपन्यांना 12 कोटी लसींची मागणी पत्रद्वारे करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या कडून  अजूनही प्रतिसाद आला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

तसेच होणारे लसीकरण कोविन अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यामुळे प्रत्येकाने टाईम स्लॉटच्या माध्यमातून जावे असे ते म्हणाले.

 

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी ही राज्यातील लसीकरणाची मोहीम सुरु करताना ती मोफत सुरु करावी की नाही याचा निर्णय उद्या कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.

मोफत लसी करणाबाबत राज्यावर काही आर्थिक भार पडणार असून त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना असतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्याच्या कॅविनेट नंतर त्याबाबत होणारा निर्णय जाहीर करतील. त्यामुळे उद्या पर्यंत वाट पहा. तसेच लसीच्या आयातीचा प्रश्न हा केंद्राच्या चर्चेशिवाय पुर्ण होऊ शकत नाही त्यामुळे केंद्राने परवानगी देणे आवश्यक असून त्यानंतरच पुढील प्रक्रिया पुर्ण करता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.