मुंबई: ‘तौक्टे’ चक्रीवादळामुळे लसीकरण आजही बंद

0

- Advertisement -

राजधानी मुंबईत ‘तौक्टे’ चक्रीवादळामुळे नागरिकांचे लसीकरण आजही होणार नाही. मागील दोन दिवसांपासून मुबईत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सलग तिसर्‍या दिवशी लसीकरण थांबविण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यानी शुक्रवारी लसीकरण मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता मुंबईत मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी लसीकरण करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने शुक्रवारी ट्विट करून संगितले होते की, चक्रीवादळामुळे लसीकरण 15 आणि 16 मे रोजी बंद असणार आहे. मात्र, वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आज सोमवार 17 मे रोजी ही लसीकरण बंद ठेवले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘तौक्टे’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ची खबरदारी म्हणून लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. मुंबईत सध्या 260 लसीकरण केंद्र आहेत.

- Advertisement -

 580 रुग्णांना इतरत्र हलवले

भारतीय हवामान खात्याने चक्रीवादळाविषयी दिलेल्या इशार्‍यानुसार कोविड-19 केअर सेंटर मधून 580 रुग्णांना इतरत्र हलवले आहे.  महपालिकेने कोविड केअर सेंटर मधून बीकेसी येथील 243, दहिसर येथील 183 आणि मुलुंड येथील 154 असे एकूण 580 रुग्णांना राज्य सरकारच्या विविध रुग्णालयात हलवले. शेवटच्या क्षणी ऑक्सिजन उपकरणांच्या उपलब्धेसाठी गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापालिकेच्या एका अधिका-याने सांगितले आहे. सोबतच इतर रुग्णालयांना आवश्यक गोष्टींची कमतरता पडणार नाही याची काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.