राज्यात अचानक का वाढत आहेत कोरोना रुग्ण? जाणून घ्या कारण

0

- Advertisement -

मुंबई: कोरोनाच्या दोन्ही लाटेत कोविड-19 ने महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातही कोरोनाचा आलेख उतरताना दिसत होता. मात्र, काल मंगळवारी (29 जून) राज्यात 8,085 नवी कोरोनाबाधित आढळले. सोमवारी हा आकडा 6,727 होता. अचानक कोरोना रुग्ण वाढण्याचे नेमके काय कारण आहे ते जाणून घेऊया.

राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळल्यापासून राज्य सरकार सतर्क झाले असून, सरकारने कोविड चाचण्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच वाढलेल्या चाचण्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी राज्यात 1,90,144 नमून्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आणि सोमवारी 1,66,163 नमून्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

…तर 2 महिन्यात राज्यातील सर्व जनतेचे लसीकरण पूर्ण करू

राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस स्वरूपामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, राज्य सरकारमधील अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले की, “जर महाराष्ट्राला लसीचे पुरेसे डोस मिळाले तर अवघ्या दोन महिन्यांत संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करता येऊ शकते.”  ते पुढे म्हणाले, “राज्यात सापडलेल्या 21 डेल्टा प्लस रुग्णांपैकी फक्त एकालाच लसीचा पहिला डोस मिळाला होता.”

शिथिल केलेले निर्बंध पुन्हा कडक केले…

- Advertisement -

मागच्या शुक्रवारी डेल्टा प्लस स्वरूपामुळे 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने कडक निर्णय घेतले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त लोकांना लस देण्यात येणार आहे. तसेच ठाणे आणि पुणे सारख्या जिल्ह्यातील सार्वजनिक जागा खोलण्याचा निर्णय काही दिवसांसाठी टाळण्यात आला आहे. यासोबतच, इतर दुकाने आणि कार्यालये संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू असतील.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.