लस आयातीची परवानगी मिळाल्यास 3 आठवड्यात सर्वांना लस देऊ- आदित्य ठाकरे

0

- Advertisement -

सध्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावा विरोधात लढण्यासाठी देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे, परंतु प्रत्येक राज्याला लसींचा अपुरा पुरवठा असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

महाराष्ट्रात हा तुटवडा जाणवत असल्याने 18 वर्षावरील लोकांसाठीचा लसीचा साठा आता 45 वर्षावरील व्यक्तिंच्या दुस-या टप्प्यातील डोस साठी वापरणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जाहीर केले आहे.

त्यामुळे राज्यातसह मुंबईतही होणारा लसीकरणाचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे परदेशातून लसी विकत घेण्याच्या शक्यता मुंबई महापालिकेला तपासून पहाण्याचे सांगण्यात आले असल्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रही लसींच्या उपलब्धतेसाठी केंद्रासोबत झगडत आहे. यातच आदित्य ठाकरेंनी त्यांच्या योजनेविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.

“आम्ही सध्या विदेशातून लसी विकत घेण्याचा विचार करत आहोत. हे जर शक्य झाले तर, मुंबईत लसीकरणाचा आराखडा बनवला असून, हे काम 3 आठवड्यात पूर्ण होईल.”

- Advertisement -

रोडमॅप (आराखडा) आहे तयार

लोकांत असलेले लसीविषयीचे सर्व संभ्रम दूर झाले असल्याचे आदित्य यांनी संगितले. आता प्रत्येकजण लस घेऊन भयमुक्त जीवन जगू पाहत आहे. विदेशातून लसी विकत घेण्याविषयी BMC सोबत चर्चा झाली आहे. लवकरच त्याविषयी पूर्ण नियोजन केले जाईल.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वात जास्त प्रभाव महाराष्ट्रावर पडला आहे. मात्र, मुंबईत मागील काही दिवसांत नवीन बधितांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.