इंधनावरील खर्च होईल का कमी? वाचा काय आहे ‘FLEX FUEL’

0

- Advertisement -

सध्या ह्या पेट्रोल अन् डिजेलच्या वाढत्या किमतीने सामान्य नागरिक फारच त्रस्त झाली आहेत.. पण त्यावर उपाय म्हणून सध्या केंद्र सरकार वाहन उद्योगासाठी फ्लेक्स-फ्युल इंजिन बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. ही वाहने flex fuel वर चालतील.. फ्लेक्स फ्युएल म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारच्या इंधनांचे मिश्रण ज्यावर वाहनं सहजपणे चालू शकतात. या सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे, जर फ्लेक्स फ्युएल वाहनं आली तर इथेनॉलचा वापर वाढेल, आणि इंधनाचे दर 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील. परिणामी याचा सर्वसामान्यांना फायदा होईल..

ह्या flex फ्युलमुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. त्यातच इथेनॉलचा वापर वाढल्यास भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून कृषी अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. तुम्हाला वाटत असेल यात शेतकऱ्यांना कसा फायदा होईल तर ऐका, इथेनॉल हे अल्कोहोलयुक्त इंधन असून, ऊस, मका तसेच शर्करा आणि पिष्टमय पदार्थ जास्त असलेल्या पिकांपासून त्याचं उत्पादन केलं जातं ! इथेनोल पेट्रोलमध्ये मिसळलं तर कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. याचा पर्यावरणाला तर फायदा होईलच पण त्याच बरोबर इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही त्यामुळेच इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते.

परंतु ह्या साठी एक विशिष्ठ कार्यप्रणालीचा अंतर्भाव करून वाहनांची इंजिने बनवावी लागतील. तसं हे सध्या वापरात असलेल्या सामान्य इंटर्नल कम्ब्युशन इंजिनसारखेच असेल. मिक्स फ्युलचा उपयोग इंजिन मध्ये केला जातो. त्यामुळे आपल्याला हवं ते इंधन आपण वापरू शकतो.

तसं पाहता पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलची किंमत ही जवळपास ६० ते ६२ रुपये प्रति लिटर च्या घरात आहे, तर पेट्रोलचा दर हा सध्या १०० रुपये प्रति लिटरच्याही वर गेलेला आहे.. आता सरकारने पुढील दोन वर्षात २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे देशाला महागड्या कच्च्या तेलाच्या आयातीवर आता फार अवलंबून रहावं लागणार नाही. २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल तेल कंपन्याना विकतील. सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याचे प्रमाण हे ८.५ टक्केच आहे, असं पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.

सर्वात महत्वाचं म्हणजे इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही. हे इंधन कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त आणि त्याचबरोबर पूर्णपणे स्वदेशी आहे. त्यामुळे हे इंधन जर वापरात आणलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा नक्कीच फायदा होईल.

पण हे सगळं करत असताना ह्या flex फ्युल मुळे काही गोष्टींवर परिणाम देखील होणार आहेत.. जसं की फ्लेक्स फ्युएल इंजिनाच्या वाहनांच्या वापरामुळे इंधनाची किंमत तर कमी होईल पण मग त्यामुळे या विशेष प्रकारच्या इंजिनमुळे वाहनांच्या किमती मात्र वाढतील.. आपल्या वाहनांमध्ये जे पेट्रोल वापरलं जातं, त्यात जास्तीत जास्त 8.5 टक्क्यांपर्यंत इथेनॉलचं मिश्रण केलेलं असतं. पण 2030पर्यंत पेट्रोलमधलं इथेनॉलचं मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत, तर डिझेलमधलं बायोडिझेलचं प्रमाण 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे !

- Advertisement -

सध्या ब्राझीलमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या गाड्याच सर्वांत जास्त प्रमाणात वापरल्या जात आहेत. तिथल्या 70 टक्क्यांहून अधिक कार फ्लेक्स फ्युएल प्रकारच्या आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून ब्राजीलमध्ये अशा वाहनांच्या वापराला खूप प्रोत्साहन दिलं जात आहे. अमेरिका, कॅनडा आणि चीन यांसारखे देशही फ्लेक्सी फ्युएल वाहनांच्या उत्पादनात आघाडीवर असलेले देश आहेत. जगभरातल्या अनेक वाहननिर्मिती कंपन्या फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या वाहनांची निर्मिती करत आहेत. एवढंच नाही तर युरोपातल्या जवळपास अठरापेक्षा जास्त देशांमध्ये फ्लेक्स फ्युएल प्रकारची वाहनं वापरली जात आहेत.

आतापर्यंत तरी भारतात फ्लेक्सी फ्युएल इंजिन असलेली वाहनं जनतेसाठी उपलब्ध झालेली नाहीत. काही कंपन्यांनी चाचण्यानसाठी अशी इंजिन तयार केली होती मात्र त्याच्या विक्रीसाठी ती बाजारपेठेत उपलब्ध झाली नाहीत.

एकूणच या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकार फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहे.

इथेनॉल हे पर्यावरणपूरक म्हणजेच एक इको फ्रेंडली इंधन आहे त्यामुळे हे पर्यावरणासाठी तेवढं नुकसानकारक ठरणार नाही. एकंदरीत सगळा विचार केल्यास flex फ्युलचा वापर भारतासाठी बऱ्याच बाजूंनी अतिशय हितकारक आहे.

– वरद जोशी

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.