चेन्नई एक्सप्रेसला सनरायजर्स हैद्राबाद ब्रेक लावणार ?

आयपीएलचा अश्वमेध 2021

0

- Advertisement -

अक्षय अ देशपांडे

गत सामन्यात रवींद्र जडेजाने आरसीबी विरुद्धच्या अखेरच्या षटकात 37 धावा फटकावत आणि 3 गडी बाद करून एकट्याच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार धोनी च्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात झालेल्या परावभवानंतर लागोपाठ चार विजयाच्या जोरावर चेन्नई संघाने गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर मुसंडी मारली आहे. फाफ डूप्लेसीस, गायकवाड, रैना, रायडू यांसारखे फलंदाज फॉर्म मध्ये असून मधल्या फळीत खेळणारे जडेजा, एस. करनच्या खेळीने चेन्नई एक्सप्रेसने वेग पकडला आहे. आज त्यांना फिरोज शाह कोठला या नव्या मैदानावरही विजयी मोहिम कायम राखण्याची आशा आहे.

दुसरिकडे हैद्राबाद संघ गुंततालिकेत आठव्या स्थानी असून आज त्यांना धोनीच्या संघाचे मोठे आव्हान असणार आहे. कर्णधार वॉर्नरने दिल्ली विरुद्धच्या गत सामन्यात सुपर ओव्हर मध्ये पराभव पत्कारला. हैद्राबाद संघाची मदार परदेशी खेळाडू बेयरस्टो, वार्नर, विल्यमसन, रशीद खान यांवरच आहे. त्यांच्या संघात असणारे भारतीय खेळाडू निराशाजनक कामगिरी करत आहेत. वेगवान आणि बलाढ्य असणार्‍या धोनी च्या चेन्नई एक्स्प्रेस ला रोखण्यासाठी सनरायजर्स हैद्राबादला सांघिक कामगिरी करत काही विशेष रणनीती आखाव्या लागणार तरच त्यांना स्पर्धेत टिकून राहता येईल.

आजच्या सामन्यात चेन्नई चे पारडे जड असले तरीही दिल्लीच्या मैदानावर खेळल्या जाणार्‍या पहिल्या सामन्यात कोण विजयी होणार ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

तुमचा पाठिंबा कोणत्या संघास .. Comment करा

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद, ठिकाण – दिल्ली, वेळ – सायंकाळी 7.30 पासून

आमने-सामने

एकूण सामने – 14

चेन्नई विजय – 10

हैद्राबाद विजय – 4

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.