कोलकाता आणि चेन्नई या दोन मोठ्या संघात आज घमासान …

आयपीएल चा अश्वमेध...

0

- Advertisement -

अक्षय अ देशपांडे

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स संघाची यंदाची सुरुवात विशेष चांगली झालेली नाही त्यांना पहिल्याच सामन्यात दिल्ली कडून पराभव पत्करावा लागला. मात्र नेहमी प्रमाणे कर्णधार धोनी च्या नेतृत्वात संघाने पुनरागमन करत दोन सामने जिंकून चाहत्यांमध्ये पुन्हा जोश निर्माण केला आहे. संघात डूप्लेसी , सुरेश रैना, रायडू हे फलंदाजांना लय सापडली असून अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा विशेष कामगिरी करीत मैदान गाजवत आहे. धोनीच्या विशेष फीनीशिंग ची चाहते वाट पाहून आहेत .

तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स महागडया संघापैकी एक असून त्यांचे फलंदाज नितीश राणा, गिल, राहुल त्रिपाठी हे धावा खेचत असताना स्फोटक अष्टपैलू रसेल मात्र फार्मात आल्याने तो चेन्नई साठी डोकेदुखी ठरू शकतो , संघात गोलंदाज कमिन्स , चक्रवर्ती आणि हरभजन सिंग असून ते आपली भूमिका योग्य बजावत असताना देखील कर्णधार ईयॅान मॉर्गन यांस सर्व खेळाडूंचा योग्य वापर करून घेता आलेला नाही. तसेच सुनील नारायण संघात येण्याची चाहते वाट पाहत आहेत,  गुणतालिकेत कोलकाता संघ पाचव्या स्थानावर आहे तर चेन्नई तिसर्‍या स्थानावर .

तर मग तुमचा पाठिंबा कोणत्या संघाला ? comment करा

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, ठिकाण – मुंबई,वेळ –सायंकाळी 7.30 पासून

 

- Advertisement -

आमने-सामने

एकूण सामने –23

चेन्नई विजय – 14

कोलकाता विजय – 8

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.