महाराष्ट्रात याच लॉकडाऊनची गरज आहे… कदाचित यापेक्षा आणखी “कठोर लॉकडाऊनची”…

0

- Advertisement -

राज्यात उद्यापासून लॉकडाऊन लागेल आणि त्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करतील अशी माहिती काहीच वेळेपुर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली…मग प्रश्न पडतोय सध्या राज्यात काय सुरु आहे… राज्यात मागच्या आठ दिवसांपासूनच कडक निर्बंध सुरु आहेत… पण ते कुठं आहेत याबाब मात्र शंका आहे… कारण जिथं पहाव तिथ तर गर्दी कायम आहे… रस्ते, मार्केट आणि इतर ठिकाणी दररोजच्यासारखी गर्दी कायम आहे.. त्याला कठोर निर्णय म्हणावं की नाही हाही प्रश्नच आहे म्हणा… पण असो…आता मंत्रीमंडळाच्या बैठकीतच निर्णय झालाय त्यामुळं उद्यापासून लॉकडाऊन लागू होईल…देर आये, दुरूस्त आये असं म्हंटल तरी काही वावगं ठऱणार नाही…

मागीलच्य एक वर्षापेक्षा जास्त दिवस होऊन गेलेत, आम्ही कोरोनाच्या बातम्या देतोय… पण मागच्या तीन आठवड्यापासून ज्या बातम्या देतोय त्या खूप भयंकर आहेत… सुरवातीला दिवसभरात राज्यातील रुग्णांचा आकडा 20 किंवा 22 हजाराच्या आसपास असायचा, आता तो दररोज 50 हजाराच्या वर गेलाय… 20 हजार रुग्ण असूनही तेंव्हा लोकांच्या मनात जी भीती होती ना…..ती भीती मात्र आता कुणालाच नाही…लोक तेंव्हा कोरोनाला “सिरीयस” घेत होते आता मात्र लोकांमध्ये भीतीच दिसत नाही… ही भिती त्या दिवशी दिसते ज्यादिवशी त्यांच्या घरातल कोणीतरी सिरीयस होतं, त्याला हॉस्पिटल मिळत नाही, रेमिडिसीवीरच्या एका इंजेक्शनसाठी दिवस दिवस रांगेत थांबाव लागतं आणि एवढ करुनही त्या व्यक्तिचा मृत्यू होतो…त्यावेळी कोरोना किती “भयंकर” आहे हे त्याला कळत…

मागच्या वर्षीही कोरोनाच्या बातम्या केल्या पण त्यात एखाद्या जिल्ह्यात किती रुग्ण वाढले, किती लोक बाहेरुन जिल्ह्यात आले, किती लोकांना शाळेत क्वारंटाईन केलं, त्यांच्या संपर्कात आलेल्या किती लोकांपर्यंत आरोग्य विभाग पोहचला, त्यातल्या किती लोकांच्या चाचण्या केल्या अशा बातम्या असाच्या…

आता मात्र सगळ्या बातम्यां विपरीत होता आहेत….जिल्ह्यात किती रुग्ण सापडले, किती रुग्णांचा मृत्यू झाला, हॉस्पिटलच्या दारात बेड, ऑक्सिजन मिळत नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झाला, एंम्बुलंन्समध्ये रुग्णाचा मृत्यू झाला, स्मशानभुमीत इतक्या चिता पेटल्या तरी आजून तितक्या मृतदेहांची “वेटींग” आहे, एंम्बुलंन्स मिळाली नाही म्हणून स्वताच्या खासगी गाडीत मृतदेह स्मशनाभुमित नेला, रॉकेलची आणि लाकडांची किती कमतरता भासतेय या बातम्या कराव्या लागताना मन व्यथित होतय…

आता रुग्ण सापडला तर त्याच्या संपर्कात कोण होत, त्यानं टेस्ट केली की नाही, बाहेरुन गावात कोण आलाय याच कोणी काहीच  विचारच करत नाही…कारण त्याकडं लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही…

सामाजिक माध्यमात पुर्वी स्टेटसला वाढदिवाच्या शुभेच्छा देणारे फोटो दिसायचे, आता भावपुर्ण श्रध्दांजलीचे फोटो दिसताहेत… एकत्र 20-20 चिता जळतानाचे फोटो समोर येताहेत, एकाच सरनावर 8 लोकांना अग्नी दिल्याचे फोटो समोर येताहेत, स्मशानभुमीबाहेर अॅम्बुलंन्सची लाईन लागलेली दिसतेय तेंव्हा मात्र काळजात चर्र होतयं…

- Advertisement -

एक खायच्या ऐवजी अर्धी भाकरी खाऊ पण घरातच राहू…

कारण हे दिवस काही कायम रहणार नाहीत…

आयुष्यभर कमावयचचं आहे, पण आपण राहीलो तर…

त्यामुळं आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या… नाहीतर “भावपुर्ण श्रध्दांजली” म्हणायचं सोडता आपल्याही हातात काहीच रहाणार नाही….

 

प्रमोद जगताप….

(लेखक दुरचित्रवाहीनीत काम करणारे पत्रकार आहेत.)

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.