चक्क डासच डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांचा करतील नायनाट !

0

- Advertisement -

दरवर्षी पावसाळा म्हणलं की हमखास घरोघरी, आसपासच्या परिसरात डासांची गुणगुण सतावते.. एवढंच नाही तर या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यांसारख्या आजारांचं प्रमाणही वाढतं ! या गोष्टींवर तसे उपाय भरपूर आहेत पण तेवढे परिणामकारक नाहीत.. अशा वेळी या समस्येवर उपाय म्हणून कित्येक दशकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून काही शास्त्रज्ञांनी अमेरिका आणि आफ्रिका यांसारख्या डासांचा जास्त त्रास असणाऱ्या देशात “genetically modified mosquitoes” सोडले आहेत ज्याने वेगवेगळे आजार पसरवणाऱ्या डासांवर मात करण्यात यश मिळू शकते ! यांनाच थोडक्यात GM Mosquitoes असंही म्हणतात. या कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात हे संशोधन अतिशय लाभदायक आणि कौतुकास्पद आहे !

GM mosquitoes हे देखील एक प्रकारचे डासच आहेत पण ते प्रयोगशाळेत प्रयोग करून बनवले जातात.. त्यात  या डासांच्या जनुकात बदल घडवून आणले जातात. व ज्या ठिकाणी एका प्रमाणापेक्षा जास्त डासांची पैदास झाली असेल तिथे त्यांना सोडून काही महिन्यांच्या आतच तिथल्या आजार उद्भवणाऱ्या डासांची संख्या नियंत्रणात आणता येते.

सध्या जगभरात आधीच कोरोना विषाणू पसरला आहे.. यात जगभरात कितीतरी लोकं अक्षरशः मृत्युमुखी पडले.. बऱ्याच देशांची आर्थिक परिस्थितिही ढासळली.. जनतेला स्वतःला सावरता-सावरता नाकीनऊ आले ! या एका विषाणूने आख्या जगाला हादरवून सोडलं ! पण हा एकुलता एकच असा विषाणू नाही ज्यापासून मानवाला संरक्षणाची गरज आहे..

त्याव्यतिरिक्तही बरेच आजार आहेत ज्यांमुळे माणसाची रोगप्रतिकरक शक्ति कमी होऊ शकते ! कोरोना व्यतिरिक्त आजही असे बरेच आजार आहेत ज्यांच्यापासून मानवाला खूप मोठा धोका आहे आणि त्यातच ह्या ऋतुत पाऊस म्हणलं की डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया हे आजार सगळ्यात आधी आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर दिसतात ! पण आता मात्र ह्या नव्या संशोधनामुळे कुठेतरी काही आजारांपासून संरक्षण मिळणार आहे.

आता हाही एक प्रकारचा डास असूनही नेमकं कशा प्रकारे आजार उद्भवणाऱ्या डासांवर मात करत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असणार.. तर तसं पाहता GM mosquito हे वेगळे नाहीत, ते सामान्य डासांसारखेच हे विशिष्ट नर डास आहेत. त्यांच्यात अनुवाशिंक प्रथिनं वाहून नेणा-या जनुकांत बदल करण्यात आले आहेत. ते जेव्हा वातावरणात सोडले जातात. तेव्हा हि विशिष्ठ अशी प्रथिनं मादी डासांकडे संप्रेषित करतील तेव्हा मादी डासांची प्रजनन क्षमता संपुष्टात येईल.

डासांमुळे उद्भवणारे अनेक आजार हे मादी डासांच्या दंशामुळेच होत असतात. त्यामुळे मादी डासांची प्रजनन क्षमताच संपविण्याचे काम हे GM mosquito करीत असल्याने नव्या डासांची पैदासच होणार नाही. पर्यायाने डासांची संख्या नियंत्रणात येते..

मादी डास हीच आपल्याला चावणारी डास असते कारण त्या वातावरणात अंडे तयार करण्यासाठी त्यांना रक्ताची गरज असते.!

सर्वात महत्वाचं म्हणजे GM mosquito मुळे पर्यावरणाला, प्राण्यांना किंवा माणसांना कुठल्याच प्रकारचा धोका नाही, उलट पर्यावरणाला व माणसांच्या आरोग्याला पूरक असा हा शोध आहे.

- Advertisement -

नेचर या जगप्रसिद्ध वैज्ञानिक संशोधन पत्रिकेतही याबद्दल पुर्वी संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यात चीनमधील दोन बेटांवर अत्यंत त्रासदायक ठरलेल्य आशियाई टायगर जातीच्या डांसाच्या नियंत्रणासाठी असा प्रयोग केल्याचे सांगण्यात आले असून त्याद्वारे आशियाई टायगर जातीच्या डासांची संख्या 94 टक्क्यांपर्यंत कमी झाले असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे.

तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही  GM mosquitoes च्या संशोधनाला

डासांच्या नियंत्रणासाठी सुरक्षित आणि संभाव्य प्रभावी मार्ग असल्याचे म्हंटलय.

फक्त चीनच नाही तर अमेरिका, ब्राजीलमधला काही भाग, Cayman बेटं आणि पनामाच्या काही भागातही या GM mosquitoes द्वारे आरोग्यास हानिकारक अशा डासांना नियंत्रणात आणण्यासाठी यशस्वीरीतत्या वापरण्यात आले ! यामुळे त्या भागातील फक्त डासांचंच प्रमाण कमी झालं नाही तर तिथल्या लोकांना होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यांसारख्या आजार होण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर घट झाली !

एवढंच नाही तर, साल २०१९ पासून जवळपास १ अब्ज GM mosquitoes सोडण्यात आलेत !

तसं पाहता  हे संशोधन खरोखरीच माणसासाठी आणि पर्यावरणासाठी खूप कल्याणकारी ठरेल.. आधीच कोरोनाची दहशत असलेल्या अशा वातावरणात ह्या संशोधनामुळे GM mosquitoes द्वारे कुठेतरी डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यांसारख्या आजारांचा काही प्रमाणात नायनाट होऊ शकेल आणि आपल्याला पावसाळ्याचा मनमुराद आनंद घेऊन काही आजारांपासून स्वतःचा बचाव करून मोकळा श्वास घेता येईल !

लेखक – वरद जोशी

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.