जगातील 20 देशात अजूनही ‘बलात्का-याशी लग्न करण्याचा कायदा’

0

- Advertisement -

न्यूयॅार्क: बलात्कारासाऱख्या घृणास्पद गुन्ह्यातून वाचण्यासाठी बलात्काराची बळी ठरलेल्या महिलेबरोबर लग्न करण्याचा कायदा जगभरातल्या 20 देशांमध्ये अजूनही अस्तित्वात असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या पाप्युलेशन फंड या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक लोकसंख्या विषयक वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला त्यात रशिय, थायलंड आणि व्हेनेझुएला या व आणखी काही देशांत बलात्कार करणारा गुन्हेगार जर बलात्कार पिडीत महिलेशी लग्न करण्यास तयार असेल तर त्याला शिक्षेपासून वाचविण्यासाठी कायदे अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एखाद्या बलात्कार पडीत महिलेला तिच्या न्यायाच्या मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवणारे असे कायदे म्हणजे गुन्हेगारांना उघडपणे पाठीशी घालते जातेय असे ड़ॅा. नतालिया कानेम यांनी म्हंटले आहे. त्या संयुक्त राष्ट्र संघ्याच्या पाप्युलेशन फंड संस्थेच्या कार्यकारी संचालक आहेत.

अशा कायद्यांमुळे लैंगिकता आणि सन्मान या दोन भिन्न गोष्टी एकत्र मिसळण्याचा पुरातन दृष्टीकोन वा संस्कृती प्रतिबिंबित झाली असून स्त्रियांना शारीरिक स्वायत्तता नसावी आणि त्या कुटुंबातील मालमत्ता असल्याचे समज वाढीस लागतात असेही निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

मोरक्को देशात एका बलात्कार पिडीत महिलेला बलात्कार करणा-या बरोबर लग्न करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु त्या महिलेने लग्न करण्यास नकार देत आत्महत्या केली. अशा घटना नक्कीच महिलांवर अन्याय होत असल्याचे अधोरेखित करतात. त्यामुळे या कायद्यांना बदलणे जरी अवघड असले तरी ते अशक्य नक्कीच नाही असे संस्थेच्या मध्य आशिया विभागाच्या संचालक डिमा डाब्बूस यांचे म्हणणे आहे.

विविध देशात बलात्काराच्या गुन्ह्यांतील शिक्षेच्या तरतूदी

भारत – जन्मठेप वा फाशी

अमेरिका – जन्मठेप

नार्वे – 4 ते 15 वर्षे तुरुंगवास

- Advertisement -

इस्राईल – 16 वर्षे तुरुंगवास

रशिया – 3 ते 20 वर्षे तुरुंगवास

फ्रान्स – 16 वर्षे तुरुंगवास

ईराण – फाशी

ईजिप्त – फाशी

अफगाणिस्तान – सार्वजनिक ठिकाणी गोळी घालणे वा फाशी

उत्तर कोरीया – थेट गोळी घालणे

सौदी अरेबिया – शिरच्छेद

चीन – फाशी

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.