ब्रिटनची राणी रडते तेव्हा….

प्रिन्स फिलिप यांना अंतिम निरोप

0

- Advertisement -

लंडन : इंग्लंडच्या राजघराण्याचा सार्वजनिकरित्या आपल्या भावनांचे प्रदर्शन करण्याचा प्रघात नाही, परंतु इंग्लंडच्या राणी आपले पती प्रिन्स फिलिप यांच्या अंतिम संस्कारा दरम्यान अश्रु ढाळताना दिसल्या.  गेल्या आठवड्यात फिलिप यांचे शुक्रवारी निधन झाले होते, त्यांचा अंतिम संस्कार विन्डसरमधील सेंट जॉर्ज चॅपल येथे शनिवारी झाला. त्यावेळी काळ्या रंगाचा वेशभुषेत असलेल्या राणीने प्रिन्स फिलिपच्या शवपेटीजवळ एकट्याने बसून एकाकी आणि वैभवशाली व्यक्तीला अंतिम निरोप दिला.

प्रिन्स फिलिप यांना औपचारिक अंत्यसंस्कार दिले गेले, सेंट जॉर्ज या राजघराण्याच्या खाजगी चर्च मधील रॅायल व्हॅाल्टमध्ये त्यांना दफन करण्यात आले.

मौन पाळून श्रध्दांजली देण्याचा भारतीय प्रघात अंत्यसंस्कारावेळी पाळल्याचे दिसून आले. देशभरात शांतता होती. शांततेच्या अनुषंगाने हिथ्रो येथील विमानतळावर कोणतेही विमान सहा मिनिटांपर्यंत खाली उतरले नाही आणि उड्डाण केले नाही.

- Advertisement -

प्रिन्स फिलिप यांची शवपेटी पारंपारिकरीत्या तोफांच्या गाडीवर नव्हे तर त्यांनी स्वतः डिझाइन केलेल्या वातानुकूलित लँड रोव्हर या गाडीवर नेण्यात आली.

कोरोना संकंटाच्यामुळे या अंतिम संस्कार कार्यक्रमात पाहुण्यांची संख्या 30 पर्यंत मर्यादित केली गेली होती.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.